Serena Williams : फक्त टेनिसच नाही तर फॅशनमुळेही सेरेना विल्यम्स नेहमी चर्चेत
Continues below advertisement
टेनिसम्राज्ञी सेरेना विल्यम्स निवृत्तीच्या उंबरठ्यावर दाखल झालीय. न्यूयॉर्कमध्ये सुरु असलेल्या अमेरिकन ओपनमध्ये खेळून, ती कदाचित आंतरराष्ट्रीय टेनिसला गुडबाय करण्याची शक्यता आहे. पण आयुष्याच्या या वळणावरही सेरेना विल्यम्सचा रुबाब हा तिच्यातल्या टेनिससम्राज्ञीला साजेसा असाच आहे. अमेरिकन ओपनच्या पहिल्या फेरीत सेरेनानं परिधान केलेला हिरेजडित काळा पेहराव हा टेनिसरसिकांना डोळे विस्फारायला लावणारा होता. नाईकी या ब्रॅण्डनं खास सेरेना विल्यम्ससाठीच हा पेहराव शिवला होता. पाहूयात एबीपी माझाचा खास रिपोर्ट.
Continues below advertisement