India vs Hong Kong Sunandan Lele : मुंबईच्या सूर्यकुमार यादवमध्ये डोकवला एबी डिव्हिलियर्स
युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी आशिया चषकात टीम इंडियाचा हाँगकाँगवरचा विजय हा अपेक्षितच होता. पण या सामन्यात हाँगकाँगच्या फलंदाजांनी लक्ष्याचा पाठलाग करताना बजावलेली कामगिरी नक्कीच कौतुकास्पद होती. अर्थात या सामन्यात खरी कमाल केली ती मुंबईच्या सूर्यकुमार यादवनं. त्यानं विराट कोहलीच्या साथीनं केलेल्या अभेद्य भागिदारीनंच टीम इंडियाला विजयासाठी भक्कम लक्ष्य उभारून दिलं. पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी थेट दुबईतून पाठवलेला रिपोर्ट.