Rudransh Patil :ज्युनियर विश्वविजेता नेमबाज रुद्रांश पाटीलला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक
महाराष्ट्राचा ज्युनियर विश्वविजेता नेमबाज रुद्रांश पाटीलने अहमदाबादमधल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये आज सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने पुरुषाच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. रुद्रांश पाटीलच्या या कामगिरीनं महाराष्ट्राला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले. रुद्रांश पाटील हा मूळचा ठाण्याचा नेमबाज आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचा तो मुलगा आहे. रुद्रांशची आई हेमांगिनी पाटील याही पोलीस सेवेत आहे.