Cricket : राहुल द्रविड भारताचे नवे कोच ? 2023 पर्यंतचा करार होणार असल्याची सूत्रांची माहिती
भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय संघाच्या पुढच्या प्रशिक्षक पदासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचं नाव चर्चेत आहे. द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यासाठी तयार असल्याची माहिती आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपद आता राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) येणार असल्याची शक्यता आहे. राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला 2023 पर्यंतचं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. मात्र अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.