राज्य सरकारची विविध खेळांच्या सरावाला परवानगी; क्रीडा क्षेत्रासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग पाहता त्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या अनेक निर्बंधांचा फटका क्रीडा क्षेत्रालाही बसल्याचं पाहायला मिळालं होतं. क्रिकेटच्या मैदानांपासून कुस्तीच्या आखाड्यापर्यंत याचे पडसाद उमटले होते. पण, अखेर खेळाडूंना मोठा दिलासा देत महाराष्ट्र राज्य शासनानं क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा निर्णय़ घेतला आहे.

कोरोना नियमांचं पालन करावं अशी सूचनाही शासनाकडून करण्यात आली आहे. या निर्णयामुळं नऊ महिन्यांनंतर आता खेळाडू पुन्हा एकदा त्यांच्या करिअरच्या वाटांवर लक्ष केंद्रीत करु शकणार आहेत.मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बॅडमिंटन असोसिएशन यांनी आखून दिलेल्या काही नियमांचं पालन खेळाडूंना करणं बंधनकारक असणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळं क्रीडा क्षेत्रावर करिअर अवलंबून असणाऱ्यांना दिलासाच मिळाला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola