Vinesh Phogat Olympic : पैलवान विनेश फोगाटची ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची पैलवान विनेश फोगट  (Vinesh Phogat)  आणि क्यूबाची पैलवान युस्नेलिस गुझमान यांच्यात उपांत्य फेरीची लढत पार पडली. 50 किलो महिला फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात विनेश फोगटनं उपांत्य फेरीत धडक दिली होती. उपांत्य फेरीत विनेश फोगटची लढत क्यूबाची पैलवान वाय. गुझमन हिच्यासोबत होणार आहे. उपांत्य फेरीत विनेश फोगटनं वाय. गुझमान हिला 5-0 असं पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली आहे. ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत धडक मारणारी विनेश पहिली भारतीय पैलवान ठरली आहे. 

कसा रंगला सामना ?

विनेश फोगटनं सुरुवातीपासून आक्रमकपणे खेळ सुरु केला होता. वाय. गुझमान बचावात्मक खेळ करत होती. त्यामुळं तिला 30 सेकंदांचा वेळ देण्यात आला होता. त्यात देखील ती गुण मिळवू शकली नाही, त्यामुळं विनेश फोगटला पहिला गुण मिळाला.मॅचच्या पूर्वार्धात विनेश फोगट 1-0 नं आघाडीवर होती.  मॅचच्या दुसऱ्या टप्प्यात क्यूबाच्या वाय. गुझमाननं पलटवार करण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या टप्प्यात विनेश फोगटला 30 सेकंदांचा वेळ गुण घेण्यासाठी देण्यात आला. यामध्ये विनेश फोगटनं 2 गुण घेत आघाडी 3-0 अशी केली.  पुन्हा 2 गुण मिळवत विनेशनं आघाडी 5-0 अशी केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola