Vinesh Phogat Olympic :  ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने घडवला इतिहास! अंतिम फेरीत धडक

Continues below advertisement

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिक (Paris Olympics)  च्या  50 किलो वजनी गटात भारताची महिला पैलवान विनेश फोगट (Vinesh Phogat) हिनं अंतिम फेरीत धडक दिली आहे. विनेश फोगटनं क्यूबाची पैलवान युस्नेलिस गुझमान लोपेझ हिला 5-0 असं पराभूत केलं आहे. विनेश फोगट ही ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणारी भारताची पहिली खेळाडू ठरली आहे. विनेश फोगट ही भारताला सुवर्णपदक मिळवू देईल, अशी आशा कोट्यवधी भारतीयांना लागली आहे. विनेश फोगटचा अंतिम फेरीचा सामना उद्या रात्री होणार आहे.  

पंचांनी वॉर्निंग दिली अन् विनेशनं इतिहास घडवला

पंचांनी विनेश फोगटला वॉर्निंग टाईम दिला होता त्यावेळी विनेशनं गुण केला नसता तर क्यूबाच्या पैलवानाला एक गुण मिळाला असता, त्यामुळं विनेश समोर करो वा मरोची स्थिती निर्माण झाली होती. विनेशनं याच वेळात आक्रमक खेळ करत लागोपाठ 2-2 गुण मिळवले. विनेश फोगटनं डावाची सुरुवात केल्यानंतर आक्रमक खेळ सुरु केला होता. त्यामुळं क्यूबाची पैलवान दबावात बचावात्मक खेळ करत होती. तिला पंचांना वॉर्निंग टाईम दिला, त्यात ती गुण मिळवू शकली नाही. त्यामुळं भारताच्या विनेश फोगटला एक गुण मिळाला. सामन्याचा पहिला टप्पा पार पडला तेव्हा विनेश फोगट 1-0 अशी आघाडीवर होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात वाय. गुझमान लोपेझ हिनं  आक्रमक खेळ सुरु केला. यावेळी विनेश फोगट थोडी बचावात्मक खेळ करत होती. यामुळं विनेश फोगटला वॉर्निंग टाईम देण्यात आला. विनेश फोगटनं या अर्ध्या मिनिटाच्या वेळात आक्रमक खेळ सुरु केला. याच वॉर्निंग टाईममध्ये विनेशनं 2 गुण घेतले. यानंतर विनेश फोगटनं पुन्हा 2 गुण घेत 5-0 अशी आघाडी घेतली.    

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram