Tokyo Paralympics च्या शेवटच्या दिवशी Krishna Nagar ला सुवर्णपदक, तर Suhas Yathiraj ला रौप्यपदक
Continues below advertisement
पॅरालिम्पिकमध्ये कृष्णा नागरनं (Krishna Nagar) इतिहास रचला आहे. कृष्णानं भारताच्या खात्यात पाचवं सुवर्णपदक आणलं आहे. आज सकाळी सुहास यथिराजनं रौप्यपदकं भारताच्या खात्यात मिळवून दिल्यानंतर कृष्णानं सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. त्यानं हॉन्गकॉन्गच्या चू मान कायचा 2-1 असा पराभव केला.
टोकियोमध्ये सुरु असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये शेवटच्या दिवशी सुहास यथिराजनं ( Suhas L Yathiraj ) इतिहास रचला आहे. त्यानं बॅडमिंटनमध्ये भारताला रौप्य पदक मिळवून दिलं आहे. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या नंबरवर असलेल्या सुहासनं आज बॅडमिंटन पुरुष एकेरीत SL4 प्रकारात हे पदक जिंकलं. अंतिम सामन्यात फ्रान्सच्या के एल माजुरनं त्याचा 21-15, 17-21, 15-21 असा पराभव केला. पराभव जरी झाला असला तरी सुहासनं भारताला पदक मिळवून दिलं आहे.
Continues below advertisement