Avani Lekhara Wins Bronze : अवनी लेखराचा अजून एका पदकावर निशाणा, कांस्यपदक जिंकलं ABP Majha

Tokyo Paralympics 2020 : टोकियोमध्ये सध्या सुरु असलेल्या 2020 पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी आणखी एक आनंदाची बातमी आली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. टोकियो पॅरालिंपिक्स (Tokyo Paralympics) मध्ये भारतानं 12वं पदक जिंकलं आहे. हे पदक भारताला मिळवून दिलं आहे ते अवनी लेखरानं. अवनीनं 50 मीटर राइफल थ्री पोजिशन स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे. अवनीनं या स्पर्धेत हे दुसरं पदक जिंकलं आहे. याआधी तिनं याच स्पर्धेत भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola