Tokyo Olympics 2021 : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाचा दुसरा विजय

Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघानं ऑस्ट्रेलियाकडून मिळालेला परभाव मागे सारत मंगळवारी स्पेनचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला. भारतानं स्पेनला 3-0 अशा फरकानं नमवलं. भारतानं पहिले दोन गोल पहिल्या क्वॉर्टरमध्ये डागला, तर तिसरा गोल शेवटच्या क्वॉर्टरमध्ये डागला. स्पेनचा संघ आठ पेनल्टी कॉर्नर मिळाल्यानंतरही गोल करण्यात अयशस्वी ठरला. भारतानं विजयासह पुल ए मध्ये आपली स्थिती आणखी मजबूत केली आहे. सध्या भारत ग्रुपमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी कायम आहे. 

भारत आणि स्पेन यांच्यातील सामन्याचा निर्णय 4 क्वॉर्टरनंतर झाला आहे. तसं पाहायला गेलं तर भारतानं आपल्या विजयावर मोहोर सामन्याच्या पहिल्या क्वॉर्टरमध्येच उमटवली होती. भारतीय हॉकी संघ सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी खेळताना दिसून आला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola