Rudranksh Patil Gold Medalist : रुद्रांश पाटीलला जागतिक नेमबाजीचं सुवर्ण

ठाण्याच्या रुद्रांश पाटीलनं ईजिप्तमध्ये सुरु असलेल्या जागतिक नेमबाजी विजेतेपद स्पर्धेत दहा मीटर्स एअर रायफल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. रुद्रांशच्या या कामगिरीनं भारताला २०२४ सालच्या पॅरिस ऑलिम्पिकसाठीचा पहिला कोटा मिळवून दिला. ही कामगिरी बजावताना त्यानं टोकियो ऑलिम्पिकच्या तिन्ही पदकविजेत्यांवर मात केली, हे विशेष.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola