Olympic 2020 : प्रविण जाधवचं आॅलिम्पिकमधलं आव्हान संपुष्टात, दुसऱ्या फेरात प्रविणचं नक्की काय चुकलं?

तिरंदाजीमध्ये भारताच्या हाती निराशा आली आहे. चांगली कामगिरी करणारा प्रवीण जाधव राउंड ऑफ 16 च्या फेरीतून बाहेर पडला आहे.  सलग तीन सेट गमावल्यानं सामना हरल्यामुळं प्रवीणचं आव्हान संपुष्टात आलं आहे. अमेरिकेच्या फ्रेडी अॅलेक्सनसमोर या सामन्यात  प्रवीण जाधव काहीसा अडखळताना दिसून आला.  

ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजीत साताऱ्याच्या प्रवीण जाधवनं शानदार कामगिरी केली. मागील सामन्यात त्यानं सलग तीन सेट जिंकत राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला होता. त्यानं जगात नंबर 2 असलेल्या खेळाडूचा पराभव करत राउंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला. मात्र इथं त्याचा पराभव झाला.  तसंच मिक्स डबल सोडलं तर व्यक्तिगत त्याची कामगिरी अन्य स्पर्धेत चांगली राहिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola