Tokyo Paralympic 2020 : भारताला दुसरं सुवर्णपदक, Sumit Antil ची भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई

Continues below advertisement

Tokyo Paralympics 2020 : भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिलने सोमवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. पहिल्यांदा पॅरालिम्पिकमध्ये खेळताना सुमितने भाला फेकण्याच्या F-64 स्पर्धेच्या दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याने आपल्या पाचव्या प्रयत्नात त्यात आणखी सुधारणा केली आणि 68.55 मीटर फेकून विश्वविक्रम केला.

सुमितने पहिल्याच प्रयत्नात 66.95 मीटर अंतरावरून भाला फेकला, जो एक विक्रम देखील आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात 68.08 मीटर भाला फेकला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने 65.27 मीटर, चौथ्या प्रयत्नात 66.71 मीटर आणि पाचव्या प्रयत्नात सुमितने 68.55 मीटर भाला फेकला. 

टोकियो पॅराॉलिम्पिकमध्ये भारताचे आतापर्यंतचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी महिला नेमबाज अवनी लखेरा (Avani Lakhera) हिने सोमवारी सकाळी सुवर्णपदक पटकावले. भारताने आतापर्यंत सुमारे 7 पदके जिंकली आहेत, यामध्ये 2 सुवर्णपदके आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram