Tokyo Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघाचा ऑस्ट्रेलियाला नमवत उपांत्य फेरीत दमदार प्रवेश

Tokyo Olympics 2020: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा 1-0 असा पराभव करत पहिल्यांदाच सेमीफायनल गाठली आहे. ग्रुप स्टेजमधून सेमीफायनलमध्ये पोहोचण्याचा विक्रम पहिल्यांदाच भारतीय महिला संघानं केला आहे. टीम इंडियानं या सामन्यात गुरजीत कौरच्या एकमेव गोलच्या बळावर हा ऐतिहासिक विजय मिळवला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 22 व्या मिनिटाला गुरजीतनं एक गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. ही आघाडी शेवटपर्यंत टिकवण्यात टीम इंडिया यशस्वी ठरली. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola