Beijing Winter Olympics : बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्घाटन, समारोह सोहळ्यावर भारताचा बहिष्कार
चीनच्या बीजिंग शहरात होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकच्या उद्धाटन आणि समारोप सोहळ्यावर भारतानं बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. गलवान खोऱ्यातील झटापटीत सहभागी चीनी सैन्याच्या हाती ऑलिम्पिकची मशाल सोपवल्यानं भारताने हा आक्रमक पवित्रा घेतलाये.. २०२० साली चीनच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये झटापट झाली होती. आणि याच झटापटीत सहभागी असलेल्या लष्करी कमांडरची चीननं मशालवाहक म्हणून निवड केली.