Nagpur Malvika Bansod: 'जायंट किलर' मालविका सर्वप्रथम 'माझा'वर, सायनाला हरवणारी दुसरीच भारतीय

भारताची फुलराणी सायना नेहवालचं इंडिया ओपन बॅडमिंटनमधलं आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आलं आहे. पण, हा सामना लक्षात राहिल तो नागपूरच्या मालविका बनसोडमुळे.. २००७ सालानंतर सायना नेहवालला हरवणारी मालविका ही पी. व्ही. सिंधूनंतर केवळ दुसरी भारतीय बॅडमिंटनपटू ठरली. विशेष म्हणजे इंडिया ओपनच्या निमित्तानं सायना आणि मालविका या दोघी पहिल्यांदाच आमनेसामने आल्या होत्या. मालविकानं त्या दोघींमधला पहिलाच सामना अवघ्या दोन गेम्समध्ये गुंडाळून कमाल केली. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola