RCB Captain : Royal Challengers Bangalore ला मिळाला नवा कर्णधार

RCB Captain : आयपीएलचं बिगुल वाजले आहे. 26 मार्चपासून आयपीएलचा रणसंग्राम सुरु होणार आहे. आरसीबी वगळता प्रत्येक संघाने आपला कर्णधार निवडला होता. आता आरसीबीनेही आपला कर्णधार निवडला आहे. विराट कोहलीने कर्णधारपद सोडल्यानंतर आरसीबीने संघाची धुरा नव्या खेळाडूकडे सोपवली आहे. आरसीबीने दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डु प्लेसिसला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) आणि दिनेश कार्तिक हेही कर्णधारपदाच्या शर्यतीत होते. मात्र, मॅक्सवेल सुरुवातीच्या काही सामन्यांना उपलब्ध नसणार आहे. प्लेसिसला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola