Punjab Kings: पंजाब किंग्सची लिव्हिंगस्टोनवर सर्वाधिक बोली, 1 कोटीवरुन 11.5 कोटी ABP Majha
abp majha web team
Updated at:
13 Feb 2022 11:02 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआयपीएलच्या मेगा लिलावात इंग्लंडच्या लियाम लिव्हिंगस्टोनवर लागलेली ११.५ कोटी रुपयांची बोली दुसऱ्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरली. यंदाच्या लिलावात सर्वाधिक रकमेची बोली लावण्यात आलेला तो परदेशी क्रिकेटर ठरला. प्रीती झिंटाच्या पंजाब किंग्सनं लिव्हिंगस्टोनवर सर्वाधिक ११.५ कोटी रुपयांची बोली लावून त्याला आपल्या ताफ्यात सामावून घेतलं. लियाम लिव्हिंगस्टोनची मूळ किंमत अवघी एक कोटी रुपये होती. पण त्याला अष्टपैलू गुणवत्तेमुळं त्याला विकत घेण्यासाठी फ्रँचाईझींमध्ये चुरस दिसून आली. त्या शर्यतीत लिव्हिंगस्टोनचा भाव त्याच्या अष्टपैलू गुणवत्तेमुळं ११.५ कोटी रुपयांपर्यंत वाढला.