Shreyas Ayyar KKR Captain : मुंबईकर श्रेयर अय्यर कोलकाता नाईट रायडर्सच्या कर्णधारधारपदी नियुक्त

Continues below advertisement

कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएलच्या १५व्या हंगामासाठी कर्णधारपदाची घोषणा केली आहे. फ्रेंचायझीने २७ वर्षीय श्रेयस अय्यरची संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड केली आहे. तो कोलकाताचा आत्तापर्यंतचा सहावा कर्णधार असेल. यापूर्वी सौरव गांगुली, ब्रेंडन मॅक्क्युलम, गौतम गंभीर, दिनेश कार्तिक आणि इऑन मॉर्गन यांनी केकेआरचं नेतृत्व केलं आहे. कोलकाता संघ दोन वेळा चॅम्पियन आहे. २०१२ मध्ये कोलकाताने चेन्नईचा तर २०१४ मध्ये पंजाबला फायनलमध्ये पराभूत केले होते. श्रेयस अय्यरला यंदा कोलकाता संघाने १२.२५ कोटी रुपयांना संघात दाखल केलं आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram