कार्तिकनं ऑईन मॉर्गनकडे सोपवलं कर्णधारपद,दिनेश कार्तिकनं कोलकात्याचं नेतृत्व सोडली की त्याला काढलं?
IPL 2020 : कोलकाता नाईट रायडर्स संघात एक मोठा बदल करण्यात आला आहे. संघ व्यवस्थापांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार, केकेआरचा कर्णधार कार्तिकने आपलं कर्णधार पद इयोन मोर्गनकडे सोपवलं आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या वतीने सांगण्यात आलं आहे की, 'दिनेश कार्तिकने संघ व्यवस्थापकांना माहिती दिली आहे की, 'आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि संघाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याने इयोन मोर्गनकडे आपल्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपावली आहे.'