Kieron Pollard : खेळणार तर Mumbai Indians कडूनच, पोलार्डचा IPL ला अलविदा, पण तरीही MI सोबत राहणार!
शशांक पाटील
Updated at:
16 Nov 2022 09:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाकडून इंडियन प्रीमियर लीग मागील कित्येक वर्षे गाजवल्यावर अखेर यंदाच्या आयपीएलपूर्वी पोलार्डने निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी आयपीएल 2023 च्या मिनी ऑक्शनपूर्वी मुंबई इंडियन्सने पोलार्डला रिलीज केलं असून पोलार्डने एक भावूक पोस्ट शेअर करत आयपीएलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. मुंबई इंडियन्समध्ये नाही तर कोणत्याच संघात नाही असं स्पष्ट वक्तव्य करत 12 वर्षे मुंबईकडून खेळल्यानंतर पोलार्डने MI सह आयपीएलला अलविदा केला आहे.