CSK player corona | चेन्नई सुपर किंग्जच्या खेळाडूला आणि सपोर्ट स्टाफला कोरोनाची लागण, IPLमध्ये कोरोनाचा शिरकाव

युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघातील एक गोलंदाज आणि सपोर्ट स्टाफमधील 12 जण कोरोना विषाणूने संक्रमित झाले आहेत. कोरोनाची लागण झालेले चेन्नईच्या संघातील सर्व सदस्यांची तब्येत स्थिर असून त्यांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. यामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम सुरु होण्याआधीच बीसीसीआयला मोठा धक्का बसलाय. राजस्थान, पंजाब या संघांनी आपला क्वॉरंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतर सरावाला सुरुवात केली आहे. दुबईत दाखल झाल्या-झाल्या सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची करोचा चाचणी करण्यात आली होती. मात्र संघातील सपोर्ट स्टाफमधले १२ सदस्य आणि एका खेळाडूला करोनाची लागण झाल्यानंतर चेन्नईच्या संघाने क्वारंटाइन कालावधी आठवडाभरासाठी वाढवला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola