Mumbai Indians : मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात मधमाशांची एन्ट्री, खेळाडूंचं लोटांगण

Continues below advertisement

Mumbai Indians :  मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमिअर लीगचे १५वे सत्र काही खास ठरेल असे वाटत नाही. सलग सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील आव्हान टीकवण्याची धडपड सुरू झाली आहे. अशात गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून गुणखाते उघडण्यासाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू कसून सराव करत आहेत. पण, त्यातही व्यत्यय आला. बुधवारी मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात मधमाशां घोंहावल्यात आणि खेळाडूंना स्वतःला वाचवण्यासाठी मैदानावर लोटांगण घालावे लागले. मुंबई इंडियन्सने स्वतःच्या सोशल मीडियवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram