IND vs NZ : न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटीसाठी भारतीय संघात मोठे बदल, अजिंक्य रहाणे कर्णधारपदी

Team India squad for NZ Tests : मुंबईकर अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) न्यूझीलंडविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. तर उपकर्णधार म्हणून चेतेश्वर पुजाराची निवड करण्यात आली आहे. विश्वचषकानंतर विराट कोहलीनं आराम घेतल्यामुळे कसोटी संघाचं नेतृत्व रहाणेकडे सोपवण्यात आलं आहे. रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शामी आणि ऋषभ पंत यांनाही कसोटीमध्ये आराम देण्यात आलाय. के. एस भरत आणि वृद्धमान साहा यांच्याकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. न्य़ूझीलंडविरोधातील दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली भारतीय संघात परतणार आहे. त्यानंतर करणधारपदाची सुत्रे विराट कोहलीकडे सोपवण्यात येणार आहेत. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola