ICC T20 WC 2021 : ऑस्ट्रेलियाची पाकिस्तानवर मात, सामन्याचे क्रिकेट समीक्षक सुनंदन लेलेंकडून विश्लेषण
ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानवर पाच विकेट्सनी मात करून युएईतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळं रविवारच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड संघांत मुकाबला पाहायला मिळेल. दुबईतल्या उपांत्य सामन्यात मार्क स्टॉयनिस आणि मॅथ्यू वेडनं सहाव्या विकेटसाठी रचलेली 81धावांची अभेद्य भागीदारी ऑस्ट्रेलियाच्या विजयात निर्णायक ठरली. या सामन्यात पाकिस्ताननं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 177 धावांचं आव्हान दिलं होतं. त्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 136व्या षटकांत पाच बाद 96 अशी अवस्था झाली होती. शादाब खाननं 16धावांत चार विकेट्स घेऊन हा सामना पाकिस्तानच्या बाजूनं झुकवला होता. त्या परिस्थितीत स्टॉयनिस आणि वेडनं 40 चेंडूंत नाबाद 89 धावांची भागीदारी रचून ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. स्टॉयनिसनं नाबाद 40, तर वेडनं नाबाद 41धावांची खेळी केली. डेव्हिड वॉर्नरनं 49धावांची खेळी करून ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला.