IND vs WI T20 Squad : वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय टी20 संघाची घोषणा, कोहली-बुमराहला विश्रांती
abp majha web team
Updated at:
14 Jul 2022 03:01 PM (IST)
वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या पाच ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. टी-२० मालिकेतून कोहली आणि बुमराला विश्रांती देण्यात आलीय. लोकेश राहुल, कुलदीप यादव हे फिट असल्यास त्यांचा समावेश संघात करण्यात येणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघात इशान किशन, सूर्यकुमार यादव, हुडा यांचा संघात समावेश करण्यात आलाय. याशिवाय श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, रिषभ पंत, हार्दिक पंड्या यांचीही संघात निवड करण्यात आलीय.