PV Sindhu : सिंधूची सिंगापूर ओपनच्या फायनलमध्ये धडक, जपानच्या कावाकामीचा धुव्वा
भारताच्या पी. व्ही. सिंधूनं सिंगापूर ओपनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. सिंधूनं महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जपानच्या सईना कावाकामीचा २१-१५, २१-७ असा धुव्वा उडवला.