IND vs SA T20WC : भारत वि दक्षिण आफ्रिका मॅच आधी भारतीय फॅन्सचा उत्साह शिगेला : ABP Majha
ऑस्ट्रेलियातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात टीम इंडियानं आधी पाकिस्तान आणि मग नेदरलँड्सला हरवलं. त्यामुळं भारतीय संघाच्या पाठिराख्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. या विश्वचषकातल्या भारत-दक्षिण आफ्रिका संघांमधल्या सामन्यात थोड्याच वेळात पर्थच्या मैदानावर सुरुवात होत आहे. या सामन्यासाठी भारतातल्या विविध राज्यांमधून क्रिकेटरसिक पर्थमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्याशी बातचीत केली आहे क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांनी.