ICC T20 WC 2021, IND vs AFG : अफगाणिस्तानसमोर भारताचं 211 धावांच आव्हान, रोहित- राहुलची दमदार शतकी सलामी

Continues below advertisement

अबुधाबीच्या शेख जायेद क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर 12 सामन्यात टीम इंडियाने पहिल्यांदा खेळताना अफगाणिस्तानला 211 धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक 74 धावा केल्या. त्याचवेळी केएल राहुलने 69 धावांची खेळी खेळली. शेवटी ऋषभ पंतने केवळ 13 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या आणि हार्दिक पांड्याने 13 चेंडूत नाबाद 35 धावांची स्फोटक खेळी केली. अशाप्रकारे भारताने 20 षटकांत 2 गडी गमावून 210 धावा केल्या. 2021 च्या T20 विश्वचषकात पहिल्यांदाच एखाद्या संघाने 200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram