IND vs AUS | टी20 विश्वचषकासाठी 'टीम इंडिया, है तैयार! सराव सामन्यात भारताची कांगारूवर मात
abp majha web team
Updated at:
20 Oct 2021 11:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुबईत खेळल्या जाणाऱ्या 2021 टी 20 विश्वचषक सराव सामन्यात पहिल्यांदा खेळत ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला 153 धावांचे लक्ष्य दिलं आहे. एकेवेळी ऑस्ट्रेलियाचे चौथ्या षटकात फक्त 11 धावांवर तीन गडी बाद अशी परिस्थिती होती. पण या नंतर स्टीव्ह स्मिथ 57, ग्लेन मॅक्सवेल 37 आणि मार्कस स्टोइनिस नाबाद 41 धावा काढत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारुन दिली. रविचंद्रन अश्विनने भारतासाठी अवघ्या 8 धावांत दोन बळी घेतले. याशिवाय राहुल चहर, रवींद्र जडेजा आणि भुवनेश्वर कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.