भालाफेकपटू नीरज चोप्रा, पैलवान रवी दहिया यांच्यासह अकरा खेळाडूंना 2021 चा Khelratna पुरस्कार

Continues below advertisement

टोकियो ऑलिम्पिकमधला सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि रौप्यविजेता पैलवान रवी दहिया यांच्यासह अकरा खेळाडूंना 2021 या वर्षासाठी केंद्र शासनाचा खेलरत्न हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ऑलिम्पिक कांस्यविजेती बॉक्सर लवलिना बोर्गोहाईन, फुटबॉलवीर सुनील छेत्री, भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज, भारताच्या हॉकी संघाचा गोलरक्षक पी. श्रीजेश यांचाही खेलरत्न पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. पॅरा शूटर अवनी लेखरासह पाच पॅरा अॅथलिट्सचा खेलरत्नच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तसंच क्रिकेटर शिखर धवनसह ३५ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराचा मान बहाल करण्यात आला आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram