Cristiano Ronaldo's girlfriend pregnant with twins : रोनाल्डो पुन्हा होणार बाबा,जुळ्या बाळांची चाहुल
abp majha web team
Updated at:
29 Oct 2021 10:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलंडन : पोर्तुगालचा स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) पुन्हा एकदा बाबा होणार आहे. रोनाल्डोनं त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्जसोबत नुकताच एक फोटो शेअर करत ही बातमी दिलीय. महत्वाचं म्हणजे जॉर्जिना जुळ्या मुलांना जन्म देणार आहेत. त्यामुळे रोनाल्डो आता चार नव्हे तर सहा मुलांचा बाबा होणार आहे.
रोनाल्डोला सध्या 11 वर्षांचा मुलगा ख्रिस्तियानो ज्युनियर, चार वर्षांची इव्हा आणि मटाओ ही जुळी मुलं तर तीन वर्षांची अलाना मार्टिन अशी चार मुलं आहेत. ख्रिस्तियानो रोनाल्डोने सोशल मीडियावर लिहिले की, "आम्हाला सांगताना अतिशय आनंद होत आहे की आमच्या घरी नवीन पाहुण्यांचे आगमन होणार आहे. आम्ही त्याची आतुरतेने वाट बघत आहे."