Yuvraj Singh Comeback : 'सिक्सर किंग' क्रिकेटच्या मैदानात कमबॅक करणार ; युवराज सिंगची घोषणा
Continues below advertisement
टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाची निराशाजनक कामगिरी सुरु आहे. अष्टपैलू खेळाडूची भारतीय संघाला उणीव जाणवतेय. याच पार्श्वभूमीवर सिक्सर किंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. मी परत येतोय असं म्हणत युवराज सिंगनं पुन्हा एकदा क्रिकेटच्या पीचवर उतरणार असल्याची घोषणा केलीय. फेब्रुवारीत क्रिकेटच्या मैदानावर उतरणार असल्याचं युवीनं म्हटलंय. २०१७ साली इंग्लंडविरुद्धच्या दीडशे धावांच्या खेळीचा व्हिडीओ शेअर करत युवराज सिंगने क्रिकेटच्या पीचवर कमबॅकचे संकेत दिलेत. मात्र तो कोणत्या सामन्यात किंवा मालिकेत खेळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
Continues below advertisement