Virat Kohli : विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा १०० वा कसोटी सामना ABP Majha
Continues below advertisement
विराट कोहलीच्या कारकिर्दीतील हा शंभरावा कसोटी सामना असून तो प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवला जाणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी ही माहिती दिलीय. सुरुवातीला हा सामना प्रेक्षकांविना खेळवण्यात येणार होता. मात्र कोहलीचा हा शंभरावा कसोटी सामना असल्याने प्रेक्षकांच्या उपस्थितीत खेळवला जावा अशी मागणी विराटच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर केली जात होती. अखेर चाहत्यांच्या मागणीपुढे बीसीसीआय झुकलं असून ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थितीत सामना खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. तर कारकीर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळणे, ही विराट कोहलीसाठी गौरवास्पद बाब असून त्याच्यासह चाहत्यांसाठी ही लढत अविस्मरणीय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असं जसप्रीत बुमराने म्हटलंय..
Continues below advertisement