Team India Update : खांदेपालट? टी-20 साठी रोहित शर्मा टीम इंडियाचा नवा कर्णधार? ABP Majha

टी-२० विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. टी-२० विश्वचषकानंतर विराट कोहली टी-२०चं कर्णधारपद सोडणार आहे. त्याच्या जागी कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. याबाबत लवकरच घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र विराट कोहलीकडून एकदिवसीय क्रिकेट संघाचं कर्णधारपदही काढलं जाणार असल्याची चर्चा रंगलीय. टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटसाठी एकच कर्णधार ठेवण्याचा निवड समितीचा विचार आहे. टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीमुळे भारतीय संघात बदल होणार असल्याचे समजतंय. त्यामुळे आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघ निवडीसह कर्णधार निवडीचं मोठं आव्हान निवड समितीपुढे असणार आहे. न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून तीन टी-२० आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola