टीम Indiaच्या पराभवानंतर Virat Kohli च्या मुलीला धमकावणाऱ्यांवर Pakistanचा Inzamam-ul-haq भडकला

पाकविरुद्ध सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर काही विकृतांकडून टीम इंडियाला ट्रोल केलं जातं आहे. त्यात आतातर थेट कॅप्टन विराट कोहलीला त्याच्या मुलीवरुन अर्वाच्च भाषेत ट्रोल करण्यात आलं. त्यावरुन पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकही भडकला असून हा नीचपणाचा कळस असल्याची प्रतिक्रिया इंझमामनं दिली आहे. शिवाय प्रेक्षकांनी हा खेळ आहे हे लक्षात ठेवावं आणि विराटच्या नेतृत्वावर टीका करा पण त्याच्या कुटुंबावर बोट कुणीच दाखवू शकत नाही असं इंझमाम म्हणाला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola