Ravi Shastri Tests Positive: टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री कोविड पॉझिटिव्ह, शास्त्रींसह 4 सदस्य Isolated

Continues below advertisement

Ravi Shastri Test Positive: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. प्रशिक्षक रवी शास्त्री यांची लेटरल फ्लो टेस्ट काल शनिवारी संध्याकाळी पॉझिटिव्ह आली, त्यानंतर बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने खबरदारी म्हणून मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह चार आयसोलेट केलं आहे.

बीसीसीआयने रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक बी अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरपिस्ट नितीन पटेल यांना आयसोलेट केलं आहे. बीसीसीआयने सांगितले की त्यांची आरटी-पीसीआर चाचणी झाली आहे आणि ते टीम हॉटेलमध्ये राहणार आहे. मात्र, वैद्यकीय संघाकडून याची पुष्टी होईपर्यंत कोरोना संशयित टीम इंडियासोबत प्रवास करणार नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram