TOKYO 2020 : Paralympic मध्ये 'जय हो', 5 सुवर्णपदकांसह भारताच्या खात्यात 19 पदकं
टोकियो : टोकियो येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेचा समारोह सोहळा आज आयोजित करण्यात आला आहे. या समारोह सोहळ्यात भारतीय ध्वजवाहकाचा मान 'गोल्डन गर्ल' अवनी लेखरा हिला (Avani Lekhra) मिळाला आहे. 19 वर्षीय पॅरालिम्पिक शूटर अवनी लेखराने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 10 मीटर एयर रायफल एसएच 1 या स्पर्धेत भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं होतं. तसेच नंतर एका कास्य पदकावरही नाव कोरलं होतं. एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकांची कमाई करणारी अवनी लेखरा ही पहिलीच खेळाडू आहे.