Virat Kohli Birthday : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 'विराट' वादळ,टीम इंडियाच्या कर्णधाराचा 33वा वाढदिवस
abp majha web team
Updated at:
05 Nov 2021 08:19 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHappy Birthday Virat Kohli : भारतीय क्रिकेटसाठी 5 नोव्हेंबर हा दिवस खास आहे. कारण, गेल्या दशकभरापासून कोट्यवधी भारतीय क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकणाऱ्या कर्णधार विराट कोहलीचा वाढदिवस 5 नोव्हेंबर रोजी असतो. सध्याच्या जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी विराट कोहली एक आहे. विराट कोहलीची तुलना नेहमीच सचिन तेंडुलकरसोबत केली जाते. 5 नोव्हेंबर 1988 रोजी दिल्लीत विराट कोहलीचा जन्म झाला होता. गेल्या दशकभरापासून विराट कोहलीनं जागतिक क्रिकेटवर राज्य केलं आहे. या कालावधीत विराट कोहलीनं विक्रमावर विक्रम केले आहेत. विराट कोहलीनं अनेक विक्रम मोडीत काढले आहेत.