IND Vs SCO T20 World Cup 2021 भारताकडून स्कॉटलंडचा 8 विकेट्सनं धुव्वा,86 धावांचं आव्हान 6.3 षटकात पार
विजय साळवी, एबीपी माझा
Updated at:
05 Nov 2021 11:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIndia Vs Scotland: दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात आज खेळण्यात आलेल्या सामन्यात भारताने स्कॉटलँडवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने स्कॉटलँडच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. दरम्यान, भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करीत स्कॉटलँडच्या संघाला केवळ 85 धावांवरच गुडांळले. या लक्ष्याचा पाठला करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीवीरांनी 6.3 षटकातच संघाला विजय मिळवून दिलाय.