ICC T20 World Cup 2021 : Black Lives Matter मोहिमेत Quinton de Kock सहभागी, माघारीसाठी मागितली माफी

Continues below advertisement

दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विन्टन डी कॉकनं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून घेतलेल्या माघारीसाठी माफी मागितली आहे. तसंच आयसीसीच्या निर्देशानुसार, ब्लॅक लाईव्हज मॅटर या कृष्णवर्णियांना पाठिंबा देण्यासाठीच्या मोहिमेत सहभागी होण्याचंही त्यानं मान्य केलं आहे. आयसीसीच्या सूचनेनुसार ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकादरम्यान प्रत्येक संघ एका विशिष्ट कृतीतून कृष्णवर्णियांसाठीच्या मोहिमेला आपला पाठिंबा असल्याचं सूचित करत आहे. त्यानुसार दक्षिण आफ्रिका संघ एका गुडघ्यावर ओणवून ब्लॅक लाईव्हज मॅटर मोहिमेसाठी आपला पाठिंबा व्यक्त करत आहे. विंडीजविरुद्धच्या सामन्याआधी क्विन्टन डी कॉकनं त्यात सहभागी होण्यास नकार दिला होता. आपल्याविषयीचा गैरसमज दूर करताना डी कॉक म्हणाला की, कृष्णवर्णियांना पाठिंबा देण्यासाठीच्या मोहिमेला माझा विरोध नाही. किंबहुना माझं कुटुंब हे मिश्रवर्णीय आहे. त्यामुळं जन्मापासूनच माझ्यावर भेदाभेद न करण्याचे संस्कार झाले आहेत.    

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram