Saurabh Netravalkar :  सौरभ अमेरिकेच्या क्रिक्रेट संघात कसा पोहोचला? ABP Majha

Continues below advertisement

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकाच्या साखळीत पाकिस्तानला सलामीच्या सामन्यात धक्कादायक पराभवाला सामोरं जावं लागलं. यजमान अमेरिकेनं चक्क बलाढ्य पाकिस्तानचा सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी पराभव करून नवा इतिहास घडवला. विशेष म्हणजे मूळचा मुंबईकर आणि मराठमोळा सौरभ नेत्रावळकर अमेरिकेच्या ऐतिहासिक विजयाचा एक प्रमुख शिल्पकार ठरला. निर्धारित २०-२० षटकांत हा सामना टाय झाला. त्या टाय सामन्यात सौरभ नेत्रावळकरनं चार षटकात केवळ १८ धावा मोजून दोन फलंदाजांना माघारी धाडलं होतं. मग त्यानंच सुपर ओव्हरमध्ये मॅचविनरची भूमिका बजावली. अमेरिकेनं सुपर ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी १९ धावांचं आव्हान दिलं होतं. पण सौरभनं त्या सुपर ओव्हरमध्ये इफ्तिकार अहमदला बाद करून पाकिस्तानला केवळ १३ धावाच मिळू दिल्या. त्यामुळं अमेरिकेला पाच धावांनी सनसनाटी विजय साजरा करता आला. अमेरिकेचा हा गटातला दुसरा विजय ठरला. या सामन्यातल्या पराभवानं पाकिस्तानवरचं दडपण वाढलं असून, रविवारच्या साखळी सामन्यात पाकिस्तानसमोर भारताचं आव्हान आहे.

 

ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात अमेरिकेच्या पाकिस्तानवरच्या विजयाचा एक प्रमुख शिल्पकार ठरलेला सौरभ नेत्रावळकर हा मूळचा मुंबईचा क्रिकेटर आहे. त्याचं शालेय आणि इंजिनीयरिंगचं शिक्षण मुंबईतच झालं. याच काळात तो मुंबईसाठी ज्युनियर आणि सीनियर स्तरावर क्रिकेट खेळला. भारतासाठी १९ वर्षांखालील वयोगटातही तो खेळला. पण इंजिनीयरिंगच्या उच्च शिक्षणासाठी सौरभ नेत्रावळकर अमेरिकेत पोहोचला आणि अमेरिकेला एक सॉफ्टवेअर इंजिनीयर आणि क्रिकेटरही मिळाला. सौरभचे आईवडील, त्याची धाकटी बहीण अजूनही मुंबईतल्या मालाड पश्चिम परिसरात राहतात. पाहूयात आमचा प्रतिनिधी अमेय राणेनं त्याचे वडील नरेश नेत्रावळकर आणि बहीण निधी यांच्याशी साधलेला संवाद.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram