Rohit Sharma कडे टी20 संघाचं कर्णधारपद, न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा
Continues below advertisement
Indian Team Squad: न्यूझीलंडचा 17 नोव्हेंबरपासून भारत दौरा सुरू होणार आहे. दरम्यान, बीसीसीआयनं न्यूझीलंड विरुद्धच्या टी- 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलीय. विराट कोहली टी-20 विश्वचषकानंतर भारतीय टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झालाय. ज्यामुळं रोहित शर्मा न्यूझीलंडविरुद्ध टी-20 मालिकेत भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. तर, केएल राहुल उपकर्णधार असणार आहे. या दौऱ्यात व्यंकटेश अय्यर आणि हर्षल पटेल यांना संधी देण्यात आलीय. याचबरोबर भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू युजवेंद्र चहलचं संघात पुनारागमन झालंय.
Continues below advertisement