दमदार पुनरागमनासाठी पुन्हा एकदा सज्ज होऊ, जय हिंद! Captain म्हणून Virat Kohli ची शेवटची पोस्ट
Continues below advertisement
Virat Kohli Post : टीम इंडियानं नामिबियाचा 9 विकेट्सनी धुव्वा उडवून विश्वचषक मोहिमेची विजयानं सांगता केली. भारताच्या गटातून पाकिस्तान आणि न्यूझीलंडनं आधीच सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म केलं होतं. त्यामुळे या लढतीत केवळ औपचारिकता उरली होती. टीम इंडियाने संपूर्ण विश्वचषकात साजेशी कामगिरी केली नसली तरी शेवटच्या तीन सामन्यात टीम इंडियाला चांगली कामगिरी करता आली. दरम्यान कर्णधार या नात्यानं विराट कोहलीचा हा अखेरचा ट्वेन्टी ट्वेन्टी सामना होता. तर रवी शास्त्रींच्या प्रशिक्षकपदाचा कालावधीही आज संपला. त्यामुळे या दोघांना टीम इंडियाकडून विजयी भेट मिळाली.
Continues below advertisement