West Indies cricket:वेस्ट इंडिज विश्वचषकातून बाहेर, स्कॉटलँडने वेस्ट इंडिजवर 7 विकेट्सने विजय मिळवला
abp majha web team
Updated at:
02 Jul 2023 08:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
आगामी एकदिवसीय विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेतून वेस्ट इंडिजचा संघ बाहेर पडलाय. पात्रता फेरीतच विंडिजचा संघ गारद झालाय. पात्रता स्पर्धेतील आजच्या सामन्यात स्कॉटलँडने वेस्ट इंडिजवर ७ विकेट्सने विजय मिळवला. आणि विंडिजच्या विश्वचषकात पात्र होण्याच्या मनसुब्यावर पाणी फेरलं. तर आधी झिम्बाब्वे आणि नेदरलँडकडून वेस्ट इंडिजचा पराभव झाला होता. क्रिकेट जगातील पहिला विश्वचषक जिंकणारा वेस्ट इंडिज पहिल्यादांच विश्वचषकाच्या मुख्य स्पर्धेतून बाहेर झालाय. एकेकाळी क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवणाऱ्या वेस्ट इंडिजवर विश्वचषकातून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावलीय. त्यामुळे भारतात होणाऱ्या विश्वचषकात दोन वेळेचा जगज्जेता विंडिज खेळणार नाही.