Roder Federer निवृत्तीनंतर पहिल्यांदाच विम्बल्डनमध्ये, चाहत्यांनी जबरदस्त स्वागत केलं : ABP Majha

निवृत्तीनंतर पहिल्यांदाच विम्बल्डनमध्ये पोहोचलेल्या रॉडर फेडररचं त्याच्या चाहत्यांनी जबरदस्त स्वागत केलं. २० वेळा ग्रँडस्लॅमवर नाव कोरणाऱ्या रॉजर फेडररने गेल्या वर्षी निवृत्ती घेतली. फेडररने ८ वेळा विम्बल्डनमध्ये ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. त्यामुळे त्याच्या आगमनानंतर सामना सुरू होण्यापूर्वी रॅकेटशिवाय मैदानात उतरणाऱ्या फेडररचं प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. शिवाय स्क्रीनवर फेडररचे काही व्हिडीओ देखील दाखवण्यात आले. यावेळी पंधरा हजार प्रेक्षकांनी फेडररला मानवंदना दिली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola