Sachin Tendulkar | नवी मुंबईत 'तेंडुलकर मिडलसेक्स'ची क्रिकेट अॅकॅडमी | ABP Majha

तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अॅकॅडमीच्या पहिल्या क्रिकेट अॅकॅडमीचं नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर लॉन्चिंग करण्यात आलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचे माजी कर्णधार माईक गॅटिंग यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला. नवी मुंबईतल्या ७ ते २१ वयोगटातल्या अंदाजे २०० खेळाडूंनी या अॅकॅडमीत प्रवेश घेतला आहे. या अॅकॅडमीचा मुख्य प्रशिक्षक म्हणून विनोद कांबळीची नियुक्ती करण्यात आली आहे. या अॅकॅडमीच्या साथीनं डी. वाय. पाटील स्पोर्टस सेंटरही सुरु करण्यात आलं आहे. या स्पोर्टस सेंटरमध्ये अनेक खेळांच्या सुविधा उपलब्ध आहेत. नवी मुंबईतल्या नागरिकांसाठी या सेंटरचं सशुल्क सदस्यत्व घेता येईल.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola