India Tour of South Africa 2021 : जय शाह इलेव्हनकडून सौरव गांगुली इलेव्हनचा एका धावेनं पराभव

भारतीय क्रिकेटच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांच्या संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या मैत्रिपूर्ण सामन्यात जय शाह इलेव्हननं सौरव गांगुली इलेव्हनचा एका धावेनं निसटता पराभव केला.
बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर या सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सामन्यात बीसीसीआयचे अध्यक्ष असलेल्या सौरव गांगुलीनं आपल्या लौकिकाला साजेशी खेळी केली. त्यानं २० चेंडूंत ३५ धावांची खेळी उभारली. पण सचिव जय शाह यांनी ५८ धावांत तीन विकेट्स काढून आपल्या संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. त्यांच्या तीन विकेट्समधली एक विकेट ही मोहम्मद अझरुद्दिनची होती. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola