IPL Auction 2021, CHRIS MORRIS sold | ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Feb 2021 07:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
IPL Auction, CHRIS MORRIS sold | साऊथ आफ्रिकेचा फास्ट बॉलिंग ऑलराउंडर ख्रिस मॉरिस आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बोली लागलेला खेळाडू बनला आहे. ख्रिस मॉरिसला राजस्थान रॉयल्सने 16.25 कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. याआधी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बोली युवराज सिंह (16 कोटी) याच्यावर लावण्यात आली होती. मॉरिस यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघाचा हिस्सा होता. त्याला आयपीएल 2020 च्या लिलावात RCB ने 10 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं.