Women's Asia Cup 2022 : भारतीय महिलांनी आज सातव्यांदा आशिया चषकावर कोरलं नाव

भारतीय महिलांनी आज सातव्यांदा आशिया चषकावर नाव कोरलं. अंतिम सामन्यात भारताने श्रीलंकेचा आठ विकेट्सनं धुव्वा उडवला. स्नेह राणा, रेणुका सिंह आणि राजेश्वरी गायकवाडच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेला 20 षटकात फक्त 65 धावा करता आल्या. स्मृती मानधनाच्या 25 चेंडूत नाबाद अर्धशतकाच्या जोरावर विजयाचं लक्ष्य भारताने फक्त साडे आठ षटकात पार केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola